प्रतिनिधी//
गडचिरोली:- २६ एप्रिल २०२५ —
काश्मीरच्या पहलगाम परिसरात नुकत्याच झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप बांधवांना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले.
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे.मृत बांधवांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी सन्मानाने पाठवण्यात आले असून देशभरात विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. आलापल्ली येथील मुख्य चौकात नागरिकांनी मेणबत्ती दिवे प्रज्वलित करून मौन पाळून आपली शोकभावना व्यक्त केली. नागरिकांनी आतंकवाद विरोधात घोषणा देत पाकिस्तान मुर्दाबादचा ही नारा दिला.संपूर्ण देशात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, नागरिकांनी एकत्र येऊन आतंकवादाच्या विरोधात एकता दाखवली आहे.