उप पोलीस स्टेशन राजाराम खा. च्या वतीने भगवान बिस्सा मुंडा भव्य मेळावा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून

212

प्रतिनिधी //

(सुरेश मोतकुरवार मुख्य संपादक)

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून

अहेरी :मा.श्री. निलोत्पल सो. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. कुमार चिंता सो.(अपर पो. अधीक्षक  प्रशासन ) ,मा.श्री.यतीश देशमुख सो . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. एम. रमेश सो. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. अजय कोकाटे सो.उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी यांच्या माध्यमातून राजाराम खा. येथे भगवान बिरसा मुंडा भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, राजाराम खा. हद्दीतील गाव पाटील तसेच मा. चव्हाण सा. कृषी परिवेषक अहेरी, मा. भास्कर तलांडे माजी पंचायत समिती सभापती अहेरी, मा. रोशन कंबगौनिवार उप सरपंच राजाराम,पोस्टेचे प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड सा, पोउपनि मोरणकर सा. Srpf जालना यांचे उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.मा. चव्हान सा यांनी शेतीपयोगी मिळणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.सदर मेळाव्यात राजाराम खा.हद्दीतील दुर्गम अतिदुर्गम अशा कोरेपली, कवठराम, पत्तिगाव, या गावातील शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे शेतीउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात 200 ते 250 नागरिक उपस्थित होते.उपस्थित नागरिकांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली व सदर मेळाव्याचे सांगता करण्यात आले.

1) धान बॅग 20 नग
2) कीटकनाशक 100नग
3) फावडे 20 नग
4) तूर बियाणे परमिट 20
5) छत्री -20
6) मुलांना वही पेन -100
शासकीय दाखले-
1) आधार कार्ड दुय्यम वाटप – 30
2) ई-श्रम कार्ड – 35
3) सा-बारा – 30
4) आभा कार्ड – 50