न्यायालयीन परिसरास आद्यक्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी कुमराम भीम असे नामकरण

51

 

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोलीचा पुढाकार

खा.अशोक नेते यांच्या हस्ते फल्काचे अनावरण

गडचिरोली:- अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलिच्या पुढाकाराने शहरातील जिल्हा सत्र न्यायालयीन परिसराला १७ डिसेंबरला २०२३ रोजी आद्यक्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी कुमराम भीम असे नामकरण करण्यात आले.

नगरांची रचना होण्यापूर्वी आदिकाळापासून येथे आदिवासींचे निवास आहे. आदिवासींच्या समुदायामुळेच या देशाला आणि देशातील अनेक राज्यांना’ आदिवासीं समाजातील महामानवांनी आपल्या प्राणांचे बलिदान देवून देशाचा गौरवशाली इतिहास नोंदवलेला आहे, निजामशाहीचा सत्ता उलथवून टाकून ब्रिटिश यंत्रणेलाही हादरवून टाकणारे क्रांतिकारकच होते, आदिवासींच्या हक्क,अस्मिता अधिकारांच्या प्रतिष्ठेसाठी गडचिरोली शहरातील जिल्हासत्र न्यायालयातील परिसराला आद्यक्रांतिकारक स्वांतंत्र्य सेनानी’ कुमराम भीम असे नाव देण्यात आले, यावेळी विद्यमान खासदार अशोक नेते हे उदघाटक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.
ह्या देशाला आदिवासी समाजाची आस्था व संस्कृती जुडलेली आहे. देशाच्य मानचित्रात गडचिरोली जिल्हा आदिवासी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. हजारो आदिवासी या जिल्ह्यात राहतात. त्यांची ओळख त्यांची संस्कृती त्यांचा महामानवांच्या ऐतीहासिक’ शौर्यगाथांच्या नावाने ओळखली जाते. आद्यक्रांतिवीर कुमराम भीम यांचा जन्म १९०१ – १९४० मध्ये झाले होते. ते हैद्राबादलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला शोषणमुक्त व भयमुक्त भारत निर्माण करू इच्छित होते. आदिवासींची अस्मिता अधीकारांसोबतच समतामूलक न्यायप्रिय समाज स्थापनेचे त्यांचे ध्येय होते. देशाला स्वतंत्र करण्यासाठी निजामसहीत इंग्रजांच्या विरूद्ध आपले जल-जंगल-जमीन यासाठी त्यांनी क्रांतीची मशाल प्रज्वलीत केली. त्यामुळे या परिसराला त्यांचे नाव देवून आदिवासी समाजाच्या ओळखीचा आधारस्तंभ ठरला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेश्राम सर,सतिशदादा कुसराम व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे,चंद्रपुर युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे,पोलीस बॉइज असोसिएशन चे गिरीश कोरामी,आकाश ढाली,प्रांतोश विश्वास,अक्षय मडावी,डेवीड पेंद्राम,उदय नरोटे,सचिन भलावी,हसीना कांदो,शिवानी तलांडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.