अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात #jantechaawaaz#news#portal#

53
प्रतिनिधी//

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार

    राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांची माहिती .











सिरोंचा :  सिरोंचा शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नॅशनल हायवे – फारेस्ट गार्डन पर्यत मुख्य रस्त्यावरील खड्डे दहा दिवसाचे आता बुजवा अन्यथा आंदोलन करणार अशी इशारा (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाधित ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार जितेंद्र सिकतोडे  यांना ०४ सप्टेंबर २०२३ निवेदन देऊन करण्यात आली होती.
















 या मागण्याची दखल शासनाने घेतली नव्हती. निवेदन दिल्यापासून तर आजपर्यंत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविताना कुठेही दिसून आली नाही,त्याकरिता  राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुभाऊ गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून येथील तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

















सिरोंचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फारेस्ट गार्डन पर्यत मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावी तसेच शहरातील इतर रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात यावी आणि या खड्यांमुळे होणारा अपघात टाळता यावा अशी आंदोलनाची मुख्य पार्श्वभूमी आहे. मात्र शासनाने मागणीची दुर्लक्षकडे पूर्णतः केले म्हणून साखळी उपोषनाला सुरु करण्यात आली आहे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेण्यात येणार नाही असे आंदोलकांनी मीडिया ला सांगितले आहे.

















सिरोंचा तहसील कार्यालयासमोर  आजपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णकुमार चोक्कमवार ,जिल्हा उपाध्यक्ष सलाम सत्तर  सय्यद ,तालुका उपाध्यक्ष सागर मुलकाला,



















शहर उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण संगेम,राष्ट्रवादीचे




















कार्यकर्ते सलमान शेख,विनोद नायडू, राजू मूलकला, उदय मूलकला ,कल्याण मूलकला, आदी उपस्थित होते.