रंगय्यापल्ली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उदघाटन सोहळा संपन्न

50
  •  

    सिरोंचा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्टनेते तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे सत्ताधारी सरकारचे कॅबिनेटमंत्री लोकनेते मा.ना.धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या आज दिनांक २०/१०/२०२३ ला रंगय्यापल्ली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा त्यांच्या शुभहस्ते उदघाटनाकरिता आला यावेळी सोबत गडचिरोली जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी संजय मिना साहेब तसेच जिल्हापरिषद गडचिरोलीचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.दावल साळवे त्याबरोबर माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम) ग्रा.पंचायत रंगय्यापल्ली चे सरपंच श्रीमती गौरक्का अर्का होते.आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर येथील जिल्हापरिषद मुलींचा लोकनृत्य घेण्यात आला.याप्रसंगी मा.ना.धर्मरावबाबा आत्राम साहेब मंचावरून बोलताना म्हणाले की,नवीन आरोग्य वर्धिनी केंद्र हा ग्रामीण रुग्णालयापेक्षा मोठी आहे.तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या जनतेला चांगला उपचार देणारा आरोग्य वर्धिनी केंद्र आहे.4 कोटी 20 लक्षने खर्च उभारलेल्या या इमारतीच्या उदघाटन माझ्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेल्या DHO डाँ.दावल साळवे यांना धन्यवाद देतो.उशिरा झाला पण काम झाला असे ते म्हणाले गेल्या मला मंत्री होऊन 2 महिने झाले.जिल्ह्याचा विकासासाठी मी 60 ते 70 जनहिताचे शिबिर घेतली आहे.अहेरी मतदारसंघाच्या ग्रामीण भागात टॉवरची मोठी समस्या आहे.ते मी उभारनच त्या विरोध आहे तरीही टॉवर उभारण्याचा काम मी 100% करणारच जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार सक्षम आहे असे ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार डाँ.मडावी यांनी केली आहे
    उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष,गावकरी त्याचबरोबर शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी आदी होते.