राजाराम येथील दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली

83

राजाराम:  उप पोलिस स्टेशन राजाराम खां येथे मा.पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा., मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर  यांच्या संकल्पनेतून व  मा. SDPO श्री अमोल ठाकूर  सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून * भव्य भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.*
       सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा.  श्री प्रतिष्ठित नागरिक श्री रमेश पोरतेट यांनी केले. सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा  यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन  व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.  मान्यवरांनी खेळ व खेळांचे महत्त्व सांगून  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.      
                  सदर व्हॉलीबॉल क्रीडा  स्पर्धेकरिता हद्दीतील   *एकूण  20 व्हॉलीबॉल संघांनी* उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेकरिता  खेळाडू  व  प्रेक्षक असे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्या मधून प्रथम क्रमांक गोलकरजी संघ,  द्वितीय क्रमांक- गुद्दीगुडम संघ   व  तृतीय क्रमांक कोंकपल्ली संघाने पटकावला.  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक याविजेत्या संघांना अनुक्रमे 3000/- रू,2000/- रू व 1000/-  रू. रोख पारितोषिक देण्यात आले.
          तसेच उपस्थित खेळाडूंना उपविभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या  स्पर्धां बाबत  मार्गदर्शन करण्यात आले.  सदर स्पर्धेत उपस्थित नागरिकांची व खेळाडूंची जेवणाची  व चहाची व्यवस्था  करण्यात आली.
     सदर स्पर्धेला हद्दीतील नागरिकांनी अभतपूर्व सहभाग नोंदवून सदर स्पर्धा आयोजित केले बाबत गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.