इंदाराम येथील भिमन्ना बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती..

47

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भिमन्ना बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या बोनालू यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून भगवान भिमन्ना देवाची आशीर्वाद घेतले.त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी भगवान भिमन्नाकडे प्रार्थना केली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच भाविक,स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते,समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.