गडचिरोली जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती-2023 अंतर्गत जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 (श्रेणी तीन) आरोग्य सेवक (पुरुष) 50% हंगामी फवारणी कर्मचारी सरळसेवा (PESA क्षेत्र) या पदभरतीबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.
सदर आदेशानुसार यापूर्वी एकत्रित मानधनावर अंदाजे ₹43,065/- देण्यात आलेल्या उमेदवारांना आता एस -9 वेतनश्रेणी (₹26,400 ते ₹83,600) वर दिनांक 11/02/2026 पासून अस्थायी नियुक्ती देण्यात येत असल्याचे नमूद आहे.मात्र निवड यादीमध्ये खालील इतर प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश दिसत असल्याने स्थानिक युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
• श्री. अमोल अशोक जाधव – बंजारा (वि.जा.-अ)
• श्री. रमेश चंद्र्या चेरकु – नक्की (खुला)
• श्री. विवेक व्यंकटराव हबळे – भटक्या जमाती (क)
• श्री. मयुर भागवत नाकाडे – कोहळी
• श्री. आदेश भगवान पुत्रावार – धोबी (इ.मा.व.)
• श्री. ज्योतीराम महादेव माने – मराठा (खुला) EWS
• श्री. कुलदिप प्रकाश इटवले – माळी (इ.मा.व.)
• श्री. सागर सिद्धेश्वर औताडे – मराठा (खुला) EWS
• श्री. आकाश खुशाल करंडे – सोनार (इ.मा.व.)
• श्री. आकाश दादाव घनमोडे – कुणबी (इ.मा.व.)
• श्री. ऋषिकेश सुनिलराव वानखेडे – कुणबी (इ.मा.व.)
• श्री. हर्ष राजेश चिच्चघरे – सावतेली (इ.मा.व.)
• श्री. कृष्णा सुधाकर गाडेकर – मराठा (खुला) EWS
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, PESA क्षेत्रातील भरतीमध्ये स्थानिक आदिवासी युवकांना प्राधान्य देण्यात आले का ? आरक्षण रोस्टर योग्य रितीने लागू झाला का ? गुणवत्ता यादी जाहीर का करण्यात आली नाही ?
नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
• संपूर्ण निवड यादी जाहीर करावी
• आरक्षण रोस्टर प्रसिद्ध करावा
• स्थानिक अनुसुचित जमाती च्या उमेदवारांना दिलेल्या प्राधान्याची माहिती द्यावी
• निवड प्रक्रियेची चौकशी करावी
• नियमभंग आढळल्यास कारवाई करावी
डॉ. नामदेव पेंदाम आणि अॅड. राकेश तोरे यांनी आदिवासी युवकांना जागृत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आज आरोग्य सेवक भरतीत प्रश्न निर्माण झाले आहेत, उद्या PESA शिक्षक भरतीमध्ये contract base वर इतर प्रवर्ग घेतले गेले तर स्थानिक युवकांचे भविष्य धोक्यात येईल.
त्यांनी युवकांना संदेश दिला आहे:
• हक्क समजून घ्या
• नियम वाचा
• अन्यायाविरुद्ध उभे रहा
• कायदेशीर मार्गाने लढा
• एकजूट ठेवा
आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.PESA क्षेत्रातील रोजगारावर पहिला हक्क स्थानिकांचा की नियमांच्या नावाखाली हक्कांवर गदा ?
हीच वेळ आहे — जागृत होण्याची आणि अन्यायाला आळा घालण्याची! 🔥
Home गडचिरोल्ली गडचिरोली जिल्ह्यात PESA क्षेत्रातील आरोग्य सेवक भरतीवर मोठा वाद! इतर प्रवर्गातील उमेदवारांची...






