गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक नं. 1 ते येनापूर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मार्फत रस्ता बांधकाम ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता सुरू करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
हे संपूर्ण क्षेत्र PESA (अनुसूचित) क्षेत्रात येत असून, PESA Act, 1996 नुसार कोणतेही विकासकाम सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेची पूर्वसंमती घेणे कायदेशीर बंधनकारक आहे. तरीही संबंधित विभागाने कायद्याचे सरळ उल्लंघन करून काम सुरू केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अॅड. राकेश तोरे यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की,
👉 “ग्रामसभेला डावलून केलेले कोणतेही काम बेकायदेशीर आहे. हा आदिवासी हक्कांवर सरळ आघात आहे. प्रशासनाने तात्काळ काम थांबवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
स्थानिक ग्रामस्थांनीही सांगितले की,
❗ ग्रामसभा घेण्यात आलेली नाही
❗ कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही
❗ थेट यंत्रसामग्री लावून काम सुरू करण्यात आले
या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
📢 “PESA कायद्याचा भंग सहन केला जाणार नाही” – नागरिकांचा इशारा






