*पदाधिकारी/कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग; माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार.*
*अहेरी:-* भारतीय जनता पक्षाचा ४७ वा वर्धापनदिन अहेरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.भाजपचे जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गुडेल्लीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या विचारसरणीला आणि संघटनाला अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता तसेच पक्षाच्या संस्थापकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. देशाच्या विकासासाठी, सुशासनासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी पक्षाने सातत्याने केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रहित, विकास आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेला विचारांचा प्रवाह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार केला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत वर्धापनदिनाचा आनंद साजरा केला.
या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.







