सिरोंचा:-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांच्या हस्ते सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रवी रलाबंडीवार,नगरसेवक सतीश राचर्लावर, नगरसेवक जगदीश रलाबंडीवार, रंजीत गागापुरवार,एम डी शानु, मारन्ना पडाला, देवय्या येंनदगुला, सरपंच गौरक्का आर्का,उपसरपंच बापू आतकुरी , सागर मारगोनी,वासुदेव भंडारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात प्रवेश होताच गावकऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर तसेच इतर मान्यवरांचे ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत केले.
ऋतुराज हलगेकर यांनी श्री हनुमान मूर्ती स्थापनेस उपस्थित राहून आशीर्वाद घेतले.तसेच गावकऱ्यांशी आस्थेने संवाद साधून समस्या जाणून घेतली.यावेळी मंदिर परिसरात भविष्यात आयोजित विविध कार्यक्रमासाठी भाविकांना अडचण होणार नाही त्या अनुषंगाने विकास कामासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आधी खेचून विकासात्मक कामे केली जाईल असे आश्वासन दिले.यावेळी रंगय्यापल्ली परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमोगली दुर्गम
जनतेचा आवाज
मराठी न्यूज चॅनल
तालुक/प्रतिनिधी
9405586753