मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय तिमरम(गुड्डीगुडम)येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 5000 लिटर पाण्याची क्षमता असलेल्या पाणी टाकी बांधकाम केले होते परंतु घरोघरी पाणी पोहचले नाही. परिणामी गावात पाण्याची टंचाई निर्माण झाला होता ही समस्या दूर करण्यासाठी वर्तमान स्थानिक प्रशासनाने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे वारंवार पाठपुरावा करून नळ जोळणी साठी निधी उपलब्ध करून नळ जोडणी कामाचे भूमिपूजन आज दिनांक २ऑक्टोबर रोजी सरपंच सरोजा पेंदाम,उपसरपंच प्रफुल नागुलवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम साजरा करून गुड्डीगुडम येथील विकासात्मक कामे नाली बांधकाम आणि सिमेंट कॅक्रिट रस्ता व आलापली-सिरोंचा मेंनरोड ते गुड्डीगुडम गावात दोन किमी डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची टाकी लाखो रुपये खर्च सदर पाण्याची टाकी चार वर्षांपासून फक्त शोभेची वस्तू बनून शाबूत उभा होता मात्र आता नळ जोडणी चे काम वर्तमान प्रशासनाने हाती घेतल्याने घरोघरी पाणी मिळण्याचे संकेत निर्माण झाला आहे त्यामुळे गावकरी ग्राम पंचायत च्या पदाधिकारी यांचे आभार मानत आहेत
नळ जोडणी, नाली बांधकाम, सिमेंट कॅक्रिट रस्ता व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन वेळी सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार,ग्राम सचिव एस. एस. सडमेक,सदस्य श्रीकांत पेंदाम,रुपेश आत्राम,घननिळा ओंनपाकला सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम,पेसा अध्यक्ष अच्युतराव सिडाम,नागेश शिरलावार, राकेश सोयाम,मोहनिस पेंदाम, सरिता आत्राम उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्राम पंचायत शिपाई श्रीनिवास आईलवार, विलास मडावी, योजना दूत रियाज कोडापे सहकार्य केले.