प्रतिनिधी//
सिरोंचा :असं संकल्प घेऊन यावेळी मेडिगट्टा प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणावर बसले आहेत. आजचा साखळी उपोषणाचा 37 वा दिवस आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 128 हेक्टरचे मोबदला तेलंगणा सरकारची वाट ना पाहता महाराष्ट्र सरकार देईल असा आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे परंतु
आश्वासनाने उपोषण मागे न घेता जोपर्यंत हातात मोबदला येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे स्पष्ट पणे शेतकरी बोलून दाखवत आहे . दररोज बारा गावातील वेगवेगळे शेतकरी उपोषणावर बसत आहे .तीन वर्षापासून स्थगित असलेल्या 128 हेक्टर चा मोबदला देण्यास शासन एवढा कालावधी लावत असेल तर प्रकल्पाचा ब्याकवाटरने 128 हेक्टर पेक्षा अधिक जमीन बुडत असल्याबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे त्याचा भूसंपादन कधी होईल असं प्रश्न
शेतकऱ्यांकडून शासनाला विचारण्यात येत आहे .देवेंद्र फडणवीस साहेब सिरोंचाला येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचा मागण्या पूर्ण केले पाहिजेत असं मागणी शेतकरी करत आहे. वेंकटेश तोकला ,लक्ष्मण गणपूरपू, मुत्यालू तोकला, सत्यम गड्डम आदि शेतकरी आज उपोषणाला बसले आहेत.