प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी तालुक्यातील गोलकर्जी आणि मरणेलि या दोन गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आम्ही आमच्या आरोग्यासाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापुर राजाराम यांचे सयुक्त विद्यमाने घेण्यात आले. यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, रक्तक्षय तपासणी, ताप, खोकला, खाज, चक्कर येणे,अशक्तपणा, हातापायाचे दुखणे, खरूज, असे पेशंटची तपासणी करून ओषध उपचार करण्यात आले तपासणी शिबिराला मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्री राजेश मानकर, डॉक्टर श्री नैताम तसेच त्यांचें कमलपुर राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपूर्ण टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले, यामध्ये मानकर सरांनी साथीचे आजार, मलेरिया, खाज, खरूज, सर्प दंश यापासून बचाव करायचां असेल तर नेहमी मच्यर दानीचां वापर करा असा संदेश दिला पावसाळ्यात पिण्याचे पाणी गरम करून पिण्याचा सल्ला, तसेच सर्पदश झाल्यास देवाकडे न जाता दवाखण्यात रुग्णाला न्यावे असा संदेश त्यांनी गावकऱ्यांना दिला, प्रकल्प समन्वयक रजनी चौध री यांनी आहारात हिरव्या पालभाज्यांचे, राणभाजीचे सेवनाने रक्तलप्ता हा आजार दूर करु शकतो असा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमाचे यशस्वीते करीता हरिदास कांबळे, आनंदराव तेलसे, संतोष पोरतेट, अरुण चालुरकर, प्रकाश सिडाम, दिपा गावडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले