लगाम -कोलपल्ली -मल्लेरा -आणि मुलचेरा बस लवकरात लवकर सुरू करा. परिसरातील लोकांची मागणी

204

प्रतिनिधी//

(सुरेश मोतकुरवार मुख्यसंपादक)

परिसरातील लोकांची मागणी

*मुलचेरा*: दि.२६ जून पासून शाळा सुरू झाली असून मुलचेरा येथे राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय मध्ये मुले मुली शिक्षण घेत असून अजून पर्यंत शाळा सुरू होऊन सुद्धा बस सेवा बंद आहे .असून सदर बस सेवा सुरू करणे फार गरजेची आहे . व बँक बाजार सर्व कामे मुलचेरा मध्ये असल्याने सदर बस सेवा बंद असल्याने लोकांना ये जा करण्यास खूप मोठी अडचण निर्माण झाली .
आहे वेळेवर बस सेवा नसल्याने सदर मार्गावर लोक पायी जात आहेत करीता सदर मार्गाची वाहतुकीची सोय अडचण लक्षात घेऊन सदर मार्गावरील बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे परिसरातील लोकांची व विद्यार्थी मागणी करत आहेत.