प्रतिनिधी//
सिरोंचा तालुका पुरपरिस्थितीला तेलंगाणा राज्यातील अतिवृष्टी तथा तेलंगाणा प्रशासनाचा बेजबाबदार पणा कारणीभूत मंचेरियाल जवळील येल्लमपल्ली तथा आदिलाबाद जवळील कडाम धरणातील पाण्याचा तेलंगाणा सरकारने एकाकी मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविल्याने तेलंगाणा राज्यातील वरंगल आदिलाबाद मंचेरियाल या जिल्ह्यात तर पुरपरिस्थिती निर्माण झालीच शिवाय सदर दोन्ही धरणातील पाणी हे गोदावरी नदीत अतिप्रमाणात आल्याने सिरोंचा मुख्यालय तथा तालुक्यातील परिसरात पुर परिस्थिती निर्माण होऊन संपुर्ण तालुका जलमय झालेला आहे. या मध्ये प्रामुख्याने सिरोंचा मुख्यालय सह नगरम ते असरल्ली दरम्यान च्या वीस गावांना पुराचा मोठा प्रमाणात फटका बसला
असून शेतातील उभे पिके नष्ट तर झालीच शिवाय गाव वस्त्यात पाणी शिरल्याणे लोकांचे आर्थिक नुकसान होऊन कित्येक नागरिकाना घरे सोडुन इतरत्र आसरा घ्यावे लागले. ही बाब विधान परिषद आमदार रामदासजी आंबटकर यांना कडताच त्यांनी शासनाने तातडीने दखल घेऊन उपाय करावेत यासाठी यांनी स्थानिक पोलिस प्रशासन, तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क करून सुचना दिल्या आणि परिस्तिथीचा वेळोवेळी आढावा घेऊन अधिकारी तथा कार्यकर्त्यांना मदतकार्य करण्याच्या सुचना दिल्या आहे.
पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने साथीच्या रोगाचे देखील धोका वाढल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि मलेरिया डेंगु तथा इतर आजाराची तपासणी करून योग्य नियंत्रण करण्याच्या सुचना मा. रामदासजी आंबटकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या.!