अहेरी येथे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात महिला मोर्चा भाजपातर्फे निदर्शने

117

 

अहेरी येथे महिला मोर्चा भाजपा तर्फे स्थानिक स्वर्गीय राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात काँग्रेसच्या खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या भ्रष्टाचारा विरोधात निदर्शने करून *’काँग्रेस हटाव गरिबी बजाव’* असे घोषणा करण्यात आले, यावेळी महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी जिल्हा मोर्चा महामंत्री तथा नगरसेविका शालिनीताई पोहानेकर, नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार, दिपाली नामेवार, प्राजक्ता पेदापल्लीवार, हर्षाताई ठाकरे, मालुताई तोडसाम,अनिता मडावी,ममता उईके आणि नगर सेवक विकास उईके,अमोल गुडेल्लीवार,संतोष मद्दीवार तसेच अन्य महिला वर्गानी निषेध दर्शविला.

आयकर विभागाकडून ६ डिसेंबरपासून काँग्रेसचे खासदार धीरज साहू आणि त्यांचे नातेवाईक अन् मित्र यांच्या ३ राज्यांतील १० हून अधिक ठिकाणांवर धाडी घातल्या जात आहेत. यात आतापर्यंत ३०० कोटी रुपयांहून अधिक रोकड सापडली असून अजूनही नोटांची मोजणी चालू आहे. ही रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. या नोटांची मोजणी करतांना आतापर्यंत नोटा मोजणारी ४ यंत्रे तुटली आहेत. यामुळे मोठे यंत्र मागवण्यात आले आहे. धीरज साहू हे मद्य निर्मिती आस्थापन ‘बलदेव साहू सन्स अँड ग्रुप’शी संबंधित आहेत. या आस्थापनाची ओडिशामध्ये २५० हून अधिक दारूची दुकाने आहेत. आयकर विभागाच्या धाडींनंतर या आस्थापनाच्या बोलंगीर जिल्ह्यातील ४२ दुकाने बंद करण्यात आली असून त्यामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी, ‘आयकर विभाग त्यांना अटक करील आणि चौकशी करील’, या भीतीने पलायन केले आहे.

जिथे जिथे काँग्रेसची सरकारे असतात तिथे तिथे असे नेते काँग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची, जनतेची लूट करतात. हा कौग्रेसचा गुणधर्मच आहे. याचा पुरावा आपल्याला नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मिळाला. काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला आणि मनमानी कारभाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिलं.
आता झारखंड मधील या २०० कोटीच्या प्रकरणांमुळे कौग्रेस बिलकुलच सुधारली नाहीये हे दिसून येतंय.

*(बॉक्स)*👇

राज्यसभेची खासदारकी ही राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणस्तथी गुणवत्ता पाहून दिली जाते. पण दारूच्या व्यवसायात असणाऱ्या आणि ज्याच्या अनेक बेकायदेशील व्यवसायांमधून अमाप संपत्ती कमावणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने राज्यसभेची खासदारी का दिलेली असेल, याचा विचार भारताच्या जनतेने करावा, असे महिला मोर्चा चे जिल्हा महामंत्री शालिनीताई पोहनेकर या वेळी म्हणाले.