गडचिरोली – सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था, नवेगांव तथा आदिवासी एकता युवा समिती व अन्य बहुजन सामाजिक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन प्रबोधन कार्यक्रम व 15 नोव्हेंबर क्रांतीविर बिरसा मुंडा जयंती चे औचीत्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर, 2023 रोजी सृष्टी सेलीब्रेशन हॉल” सेमाना बायपास रोड, नवेगांव येथे दुपारी 1.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद अलोणे यांनी भुषविले तर प्रमुख वक्ते म्हणून अँड. स्नेहा मेश्राम, सतीश कुसराम हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुकूंदाजी मेश्राम, मालता पुडो, जयश्री येरमे ह्या होत्या. याप्रसंगी *संविधानाने बहुजनांना दिलेले हक्क व अधिकार याची अंमलबजावणी एक विचारमंथन “* यावर प्रबोधन करण्यात आले. सर्व प्रथम संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी जि. प. शाळा वाकडीच्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी संविधान काय आहे याची जाणीव सामान्य नागरिकांत रुजावी म्हणून शालेय विद्यार्थी उद्याचे नागरिक या उक्तीप्रमाणे कनिका वेलादी, तनुजा बोरकुटे, कोमल वाकडे, आस्था जुमनाके, माही चौधरी, श्रावणी बोरकुटे इत्यादी यांनी संविधानपर गित गायन सादर केले तसेच कु. आस्था धिरजकुमार जुमनाके हिने भाषण दिले. यावेळी सर्व मान्यवरांनी संविधानाने बहुजनांना दिलेल्या कायदेविषयक बाबींचे महत्व त्यांनी पटवून दिले तसेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधान किती महत्वाचा घटक आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेली सामाजिक विषमता याव्दारे संविधानाचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरुन कोणत्याही विशिष्ट सामाजिक घटकावर अन्याय व अत्याचार होणार नाही व त्याला संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारांचा वापर करुन स्वतःचे अस्तित्व व संरक्षण करता यावे याविषयीचे कायदेशीर बाबी त्यांनी समजावून दिल्या. तसेच संविधानाचे पालन, संरक्षण, जनजागृती व त्याचे रक्षण कसे करता येईल यावर उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
कु. युगीनी जुमनाके तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री. धिरजकुमार जुमनाके सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन उमेश ऊईके यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता जंगोरायताड आदिवासी महिला संघटनेच्या श्रीमती मालतो पुडो, आदिवासी गॉडवाना गोटूल समिती मुरखळाचे साईनाथ पुंगाटी, नारीशक्ती संघटना गडचिरोलीचे श्रीमती जयश्रीताई येरमे, आदिवासी समाज संघटना वाकडीचे श्रावण वेलादी, बौध्द समाज संघटना वाकडीचे देवेंद्र केशव वाकडे तसेच इतर संघटनांचे सुधिर मसराम, अमोल कुडमेथे, मंगेश नैताम, प्रफुल कोडाप, आकाश कोडाप, सुभेदार जोगेश्वर मरस्कोल्हे, रेवनाथ निकुरे इत्यादी नागरिक उपस्थित होते