आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
अहेरीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे शानदार उदघाटन
*अहेरी-* प्रत्येकांनी पौष्टिक तृणधान्य सेवन करून शरीर यष्टि मजबूत व निरोगी ठेवा असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते मंगळवार 21 फेबुवारी रोजी स्थानिक माता परमेश्वरी कन्यका मंदिराच्या सभागृहात कृषि विभागाच्या वतीने “पौष्टिक तृणधान्य खाऊ या, निरोगी राहुया” या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यशाळेच्या उदघाटना प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम हे होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कृषि विभागाचे उपविभागीय अधिकारी आनंद गंजेवार, संवर्ग विकास अधिकारी अशोक कुजरेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रेमराव लोखंडे, तालुका आरोग्य अधकारी डॉ.किरण वानखेड़े, अहेरी तालुका कृषि अधिकारी संदेश खरात, भामरागडचे तालुका कृषि अधिकारी अमोल नेटके, अरुण मुक्कावार, मांतय्या आत्राम, बाबूराव तोरेम आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय स्थानावरुन पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले
की, अलीकडे मानवांचे खाद्य पदार्थात मोठ्या प्रमाणात बद्दल झाले असून ‘जुने ते सोने’ समजून ज्वारी, बाजरी, मका असे तृणधान्य सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते , “हेल्थ इज वेल्थ” अर्थात आरोग्य हिच खरी संपत्ती असून गहू, तांदळापेक्षा सर्वांनी ज्वारी, नाचणी, बाजरीचा दैनंदिन सेवनात वापर करावे असे आवाहन करून यावेळी पौष्टिक आहाराचे विविध उदाहरणासहित महत्त्व पटवून दिले.
तर अध्यक्षीय स्थानावरुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी, अलीकडे मुले नवनवीन वस्तु व खाद्य पदार्थासाठी घट्ट करतात पन पालकांनी लहान मुलांचे घट्ट न पुरविता पौष्टिक तृणधान्य आहाराकड़े सवयी लावल्यास देश सुदृढ़ बनतो असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेड़े, यांनीही पौष्टिक तृणधान्य विषयी चिकित्सक पणे आपले विचार व्यक्त केले.
ततपुर्वी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी फित कापून शाही थाटात कार्यशाळेचे उदघाटन केले आणि लावलेल्या विविध स्टॉलचे निरीक्षण व अवलोकन करून पदार्थांचे सेवनही केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उपविभागीय कृषि अधिकारी आनंद गंजेवार यांनी तर सूत्रसंचालन समीर पेदापल्लीवार यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल नेटके यांनी मानले.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाड़ी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट व अन्य विविध विभागातील विभाग प्रमुख व कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.