गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकाचे सुशोभीकरणास सुरवात #jantechaawaaz#news#portal#

43

प्रतिनिधी//
गडचिरोली:-  शहरातील एकमेव मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकाच्या सौंदर्यीकरणाला सुरवात झाली. मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या इंदिरा गांधी चौकापासून चंद्रपूर,चामोर्शी,धानोरा तसेच नागपूरकडे जातात.या चारही मार्गावर
 वाहनांची नागरिकांची वर्दळ सुरूच असते. आता इंदिरा गांधी चौकातील हायमास्ट सभोवताल चबुतरा तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी चारही बाजूला आदिवासी क्रांतीकारकाचे पुतळे राहणार असुन चारही दिशेला स्वागत करणाऱ्या मुद्रेत महील्यांच्या प्रतिकृती राहणार असल्याचे संकल्प चित्रातून दिसून येत आहे.
यामुळे इंदिरा गांधी चौकाच्या सौंदर्यीकरनात  आणखी भर पडणार आहे.