तिमरम जिप शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत अध्यक्ष महेश मडावी तर उपाध्यक्ष रेश्मा सिडाम यांची निवड

56

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:- राजाराम केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिमरम येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी सरपंच सरोजा पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा आयोजित करून ११सद्स्यीय शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षपदी म्हणून माजी सरपंच महेश मडावी तर उपाध्यक्षपदी रेश्मा सिडाम यांची निवड करण्यात आले. सदस्य म्हणून अच्युतराव सिडाम,रवींद्र मडावी, रुपेश पिठ्ठला, सुरेश रामगिरीवार, सरोजना सिडाम,अनु आईलवार, जयश्री मडावी, शोभा भोयर, मिनाक्षी सडमेक विद्यार्थी प्रतिनिधी प्राची आत्राम तर सचिव म्हणून मु.अ आत्राम म्याडम यांची निवड करण्यात आले आहे.
या वेळी शाळेला मूलभूत सोय-सुविधा पूर्ण करून शाळेचा दर्जा उंचविण्यास प्रयत्न करणार असल्याचे नवंनिवड समितीने मानस व्यक्त केले. नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सभेचे संचालन शिक्षक मधुकर गांगरेड्डीवार, तर प्रास्तविक मुख्यध्यापक आत्राम तर आभार शिक्षक सुरेश गुंडावार यांनी मानले. या वेळी शाळेतील विद्यार्थी, पालक वर्गआणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.