मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*मुलचेरा:-* तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंदुकपल्ली गावातील काही शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करत होते.शेतात काम करीत असताना पाऊस सुरू होता आणि विजाचा कड-काडट सुरू झाला.त्यावेळी 3 वाजता दरम्यान अचानक वीज पडली त्यामुळे तिथे काम करत असलेल्या शेतकरी नितेश दिवटीवार आणि काजल आत्राम यांच्यावर आघात झाला,या दोघांना ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे उपचारसाठी भरती करण्यात आले,नितेश दिवटीवार हा शेतकरी अत्यंत गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील रेफर करण्यात आले. तर काजल आत्राम या महिलेचा उपचार मूलचेरा येथे सुरू आहे.ही माहीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी फोन करून रुग्णाची माहिती घेतली आणि त्यांना तात्काळ 20000/-(वीस हजार रुपये) आर्थिक मदत आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पाठवली. आणि आपण सर्वपरी सहकार्य करणार असे आश्वासन दिले.!
यावेळी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप आत्राम, ग्रामपंचायत सदस्य बादल शाह,नगरसेवक विजय कुडमेथे,गणेश बँकावार,पवन आत्राम, विजय शेट्टीवार,दिगंबर गावडे, विजय गेडाम,सदाशिव आत्राम हे उपस्थित होते.