(सुरेश मोतकुरवार मुख्य संपादक)
गडचिरोली, दि. 1 : विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्म दिवस ’29 जून’ हा दिवस ” राष्ट्रीय सांख्यिकी दिन ” म्हणून जिल्हा सांख्यिकी कार्यालय येथे साजरा करण्यात आला.
जिल्हा सांख्यिकी उपसंचालक श्रीराम बा. पाचखेडे यांचे अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा करण्यात आला. त्यांनी जेष्ठ सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या सांख्यिकी शात्रातील अनमोल योगदानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, नियोजन विभागाचे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील उपस्थित होते.
यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या “Use of Data for Decision Making” या विषयावर आणि प्राध्यापक महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी उपयोजित अर्थशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सहायक प्राध्यापक डॉ. अनंता गावंडे, डॉ. धैर्यशील खामकर, डॉ. महेंद्र वरदलवार व डॉ. सुरेखा हजारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयतील जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सांख्यिकी अधिकारी सुभाष कुमरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री स्वप्नील वनकावार, सहायक संशोधन अधिकारी यांनी केले.
000