चीनवट्रा येथील भगवान हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

145

अहेरी : तालुक्यातील चीनवाट्र येथील हनुमान मंदिरात भगवान हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी चीनवट्राचे माजी सरपंच रवींद्र आत्राम,समय्या गावडे उपसरपंच चीनवट्रा,शंकर आत्राम,वासुदेव सिडाम कॉग्रेस कार्यकर्ते,रामय्या पोरतेट,पुलय्या पोरतेट,शामराव पोरतेट,लसमय्या आत्रामसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.