सिरोंचा:-तालुक्यातील मोयाबीनपेठा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोंड्रा येथील चिमुकल्यांना नवीन अंगणवाडी इमारत मिळणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्रीनिवास कडार्ला,माजी उपसभापती सत्यम परपटला,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून बोंड्रा गावातील चिमुकल्यांना नूतन अंगणवाडी केंद्र मंजूर करून बांधकाम करण्याची मागणी गावकाऱ्यांकडून करण्यात आली होती.यासाठी भाग्यश्री आत्राम यांनी वेळोवेळी प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतले.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बोंड्रा गावातील चिमुकल्यांना आता नूतन अंगणवाडी केंद्र मिळणार आहे.
नूतन अंगणवाडी इमारतीबाबत गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्यामुळे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.